पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी..

दिनांक १५ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

अतिवृष्टीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानाची शेतकरी बांधवांना तात्काळ भरपाई मिळावी. या मागणीसाठी नायाब तहसीलदार चारूशीला पवार मॅडम यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रशांत ओगले (काॅग्रेस महासचिव), राष्ट्रवादी युवकचे (तालुकाध्यक्ष) ऋषिकेश गायकवाड, टिळक भोस (जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड), डाॅ. बायकर गोरख (युवक काँग्रेस अध्यक्ष), अमोलदादा कोहक (मनसे तालुकाध्यक्ष), राजु पोकळे (प्रहार अपंग संघटना, अध्यक्ष), संदीप उमाप (सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), विजय खेतमाळीस, राजेंद्र राऊत व प्रशांत सिदनककर, अनिल कणसे, गोरख कानडे, शशिकांत जाधव, सनी चव्हाण, शरदभाऊ श्रीरामसह समर्थक व शेतकरी हित प्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी हीतासाठी सर्व एकत्र आले यासाठी प्रशांत ओगले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

स्रोत:(प्रशांत ओगले यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading