मी बारावीत असताना वडीलांच निधन झाले. त्यावेळी साडे तीन लाखाचा कर्ज बोजा होता. अशा परिस्थितीत माझी आई सुलोचनाबाई हिने आधार दिला आणि मित्रांच्या मार्गदर्शनाखाली शेतीतील पिकांचा पॅटर्न बदलला आणि कमर्शियल शेती करण्याचे व्हिजन ठेवले. सध्या बेलवंडी स्टेशन जवळ दहा एकर द्राक्ष मळा उभा आहे या मळ्याने प्रपंचात आर्थिक गोडवा निर्माण केला आहे. अशी सुभाष मच्छिंद्र काळाणे यांनी दिली.
वडिलोपार्जित दहा एकर शेती होती. मी आशा, शारदा आम्ही तिघे भावंडे. शेतात ज्वारी, गहु थोडा फार ऊस सोडून काहीच पिकत नव्हते. सन १९९४ साली वडील वारले डोक्यावर कर्ज होते कॉलेज करता करता शेतीत लक्ष घातले. आणि माझे लग्न आधोरेवाडी येथील भीवराज लकडे यांची कन्या सुरेखा हिच्याशी झाला मला अमोल संजोत व निकीता ही मुल झाली आणि जीवनात परिवर्तनाची लहर निर्माण झाली. अमोल इंजिनिअर झाला संजोत बी.ई. कॅप्युटर तर निकिता बी.कॉम. करते.
सुरेशभाऊ डाके, अशोक होले, पिंटू बोडखे, अशोक काळाणे, नवनाथ रसाळ, मनोहर लकडे या मित्रांचे मार्गदर्शन घेऊन सुरूवातीला चार एकर क्षेत्रात शरद सिडलेस द्राक्षांची लागवड केली. यामधून शास्वत पैसे मिळाले आणि सर्व शेती द्राक्ष खाली आणण्याचा निर्णय घेतला. चार एकर क्षेत्रात माणीक चमन तर दोन एकरात सुपर सोनाका द्राक्षेची लागवड केली. सर्व शेती द्राक्ष खाली आली. अमोल इंजिनिअर झाला वीस हजार पगाराची नोकरी सोडून त्याने शेतीत लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याला नकार दिला नाही. तो शेतीत आला मलाही आनंद झाला आणि शेतीचा लुक बदलला आणि परिवाराला सुख समाधान मिळू लागले. आता दरवर्षी शेतीतून सर्व खर्च वजा जाता ५० लाखाचा निव्वळ नफा राहतो. त्यामुळे द्राक्ष शेती आय. टी. पार्क मधील नोकरीला भारी आहे. सध्या पाणी टंचाई मोठी समस्या आहे. पण उन्हाळ्यात द्राक्षे शेतीला माल निघून गेल्यानंतर पाणी कमी लागते त्यामुळे द्राक्ष हे पिक पाणी टंचाईवर मात करणारे पिक आहे. नियोजन आणि वेळेवर औषध फवारणी आणि छाटणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
संदेश
शेतीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. पण शेतीत मुलांनी मन लावून काम केले. तर, निश्चितच शेतीतून धन लाभ होण्यास सहज मदत होईल. एखाद्या कुंटुबाला चार एकर शेती असेल. या शेतीत त्या कुंटबाने इमानदारीने काम केले. तर, ते कुंटूब फोर व्हिलर मध्ये फिरू शकते. तरूण मुल नोकरी करून आपली बायको आणि दोन मुलं याचा विचार करतात. पण, शेती केली तर नाव होते आणि नवे मित्र तयार होतात. हा माझा अनुभव आहे. सुभाष काळाणे बेलवंडी.
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे..
