दिनांक २८ जुन २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगांव शिवारात दोन आरोपींनी क्रूरपणे वागवलेल्या गौवंशीय जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याचा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ह) व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम-५ (ब), ९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई एस. यु. शिंदे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि तपासी अंमलदार स. फौ. एन. के. भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
फिर्यादी सागर दयानंद शेळके यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पांडुरंग गोरे आणि श्रीधर खराबे यांनी त्यांच्या महिंद्रा पिकअप गाडीमध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने उपाशीपोटी आणि चारापाण्याविना सहा देशी बैलांची क्रूरपणे वाहतूक करताना सापडले.
श्रीगोंदा पोलीसांनी आरोपींविरुद्ध भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.
स्रोत:(फिर्याद)




