नगर-दौंड मार्गावर दुचाकीला टेम्पोची धडक: ४२ वर्षीय महिला ठार..

दिनांक २८ जून २०२४ श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे नगर – दौंड मार्गावर दिनांक २८ जून रोजी एक दुर्दैवी अपघात घडला. खडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या मुलाला धडक दिली, ज्यामुळे ४२ वर्षीय महिला गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, चिंभळा येथील ४२ वर्षीय महिला व तिचा मुलगा घारगाव येथे दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. त्या वेळी घारगाव स्टॅन्डजवळ खडी वाहतूक करणारा टेम्पो क्रमांक एम एच १२ केपी ८११३ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत महिलेला गंभीर दुखापत झाली व ती खाली कोसळली. दुर्दैवाने, तिच्या एका बाजूवरून टेम्पोचे मागील चाक गेल्यामुळे ती जागीच गतप्राण झाली.

अपघातानंतर बेलवंडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्दी कमी करून वाहतूक पूर्ववत केली.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading