अतिक्रमण हटविण्यासाठी श्रीगोंदा नगरपालिके समोर पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे प्राणांतिक उपोषण.

दिनांक ८ डिसेंबर,श्रीगोंदा:

मौजे श्रीगोंदा येथील सिटी सर्वे नंबर ६२ मध्ये आम्ही आमच्या श्रीगोंदा तालुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या बांधकामासाठी जागा घेतली होती. त्या जागे पुढे नगरपालिकेच्या रस्त्यावर श्रीगोंदा नगरपालिकेच्या हंगामी कर्मचारीने टपरी टाकून ती भाड्याने दिल्यामुळे सुमारे पाच वर्षे आम्हाला पतसंस्थेचे बांधकाम करता आले नाही. परिणामी आमचे बांधकामाचे अंदाजपत्रक ३० लाखावरून ५० लाखापर्यंत वाढले. श्रीगोंदा नगरपालिकेला वेळोवेळी सांगूनही त्यावेळी ती टपरी न हलवल्यामुळे आम्हाला आमच्या बांधकामात २० लाखाचा भुर्दंड सहन करावा लागला आणि नगरपालिकेच्या हंगामी कर्मचारी ने मात्र सुमारे पाच ते सहा लाख रुपये भाडे कमावले. अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन प्रा. तुकाराम दरेकर यांनी दिली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

मुख्य कार्यकारी अधिकारी कोळेकर यांनी पोलिस बंदोबस्त घेऊन नगरपालिकेच्या रस्त्यावरील ती टपरी काढल्यावर आम्हाला आमच्या पतसंस्थेचे बांधकाम पूर्ण करता आले.पतसंस्थेच्या सुरक्षिततेसाठी आता आम्हाला संरक्षक भिंत बांधावयाची आहे. परंतु, सिटी सर्वे नंबर ६५ मधील लोकांनी नगरपालिकेच्या रस्त्यावर आणि आमच्या जागेत अतिक्रमण करून टपरी टाकल्याने आम्हाला संरक्षक भिंत बांधता येणे अशक्य झाले आहे. शिवाय शेजाऱ्यांच्या सर्व शेळ्या आमच्या पतसंस्थेच्या पडवी मध्ये बसून संपूर्ण पडवी घाण करतात.आमच्या व नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमणात टाकलेली टपरी हलवावी म्हणून, गेली दोन वर्ष आम्ही श्रीगोंदा नगरपालिकेला पत्रव्यवहार करीत आहोत. श्रीगोंदा नगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या संरक्षक भिंतीचे काम अडून पडले आहे.

श्रीगोंदा नगरपालिकेने अतिक्रमणात असणारी ती टपरी दिनांक १० डिसेंबर २०२० पर्यंत न हलविल्यास श्रीगोंदा तालुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ दि.११ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजले पासून श्रीगोंदा नगरपालिके समोर प्राणांतिक उपोषणाला बसणार आहे. अतिक्रमण हटविल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाहीत. असा इशारा प्रा. दरेकर यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार, पोलीस निरीक्षक, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.

स्रोत:(प्रा.तुकाराम दरेकर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading