श्रीगोंदयातील या दुर्घटनेत असा ओढवला मृत्यू..!

दिनांक २९ डिसेंबर, श्रीगोंदा:

महामार्ग झपाट्याने वाढत आहेत. रस्ते.. गाव, शहरं अनं देशाला जोडणारी प्रक्रिया आहेत. मात्र, याच रस्त्यांवर अनेक भीषण अपघात होऊन, कित्येकांना आपले प्राण तसेच, प्रिय जणांना मुकावे लागले आहे. असाच तो अपघात सकाळी गोव्यासाठी औरंगाबाद येथून निघालेले कुटुंब श्रीगोंद्यातील पारगाव फाटा येथे अपघातग्रस्त झाले. अनं उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. पती, पत्नी, दोन मुली असे फिरण्यासाठी गोव्याला चाललेल्या कुटुंबावर या दुर्घटनेने काळाचा घाला घातला. नेमके काय झाले होते त्या दिवशी.?

वैजनाथ जिल्हा कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील रहिवासी असलेले संदीपकुमार कटोच हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. कामानिमित्त ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात. दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास पत्नी रिंपी दोन मुली आराध्या व अवनी यांच्या शाळेला सुट्टी असल्याने, औरंगाबाद येथून गोव्या करिता त्यांच्या आय 20 गाडी मधून निघाले. सदर गाडी स्वतः संदीपकुमार चालवत होते. तर, शेजारी पत्नी रिंपी आणि मागे दोन्ही मुली बसल्या होत्या.

सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास नगर वरून दौंड च्या दिशेने जात असतांना पारगाव फाटा, श्रीगोंदा येथे समोरून दौंड कडून नगर कडे जाणारी पांढऱ्या रंगाची गाडी जोरात आली. तिला संदीपकुमार यांनी हॉर्न व लाईट डीपर दिला. परंतु, ती पांढरी गाडी थेट त्यांच्या दिशेनेच आली. रोडच्या डाव्या बाजूला साईड गटर व खड्डा असल्याने संदीप कुमार यांनी त्यांची गाडी उजव्या बाजूस वळवण्याचा प्रयत्न केला. अनं तेवढ्यात समोरची पांढरी कार गाडीचा डाव्या बाजूस येऊन जोरात धडकली.

या घटनेनंतर संदीप कुमार यांनी खाली उतरून पाहिले असता, समोरील गाडीचे एअरबॅग खुले होते व ड्रायव्हर पळून गेलता. संदीपकुमार यांच्या गाडीच्या डाव्या बाजूचा दरवाजा अपघातात पूर्ण शतीग्रस्त झाला होता. पत्नी रिंपी हिच्या डोक्यास, पाठीस व पायास गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. मुलगी आराध्याच्या डाव्या पायाला मार लागल्याने पाय सुजला होता व मोठी मुलगी अवनी हिला जबर मार लागला होता.

लोकांच्या जमलेल्या गर्दीतील कोणीतरी एकाने ॲम्बुलन्स साठी 108 ला फोन केला. उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे सर्वांना नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने पत्नी रिंपीला डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत असल्याचे घोषित केले.

मुलींना शाळेला सुट्टी असल्याने हे कुटुंब औरंगाबाद वरून गोव्यासाठी निघाले होते. आनंदाने बाहेर पडलेल्या या कुटुंबावर या अशा दुर्घटनेने मात्र, मोठे दुःख ओढावले. Death in this accident in Shrigonda ..!

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading