काष्टी येथील २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद..

दिनांक २६ फेब्रुवारी २०२६,श्रीगोंदा:

काष्टी (पुनर्वसन) येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा गळफास लागलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. काजल सोनू खराडे असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (AD) नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत काजल यांची आई निता मनोज ढवळे या सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना त्यांना जावयांच्या मित्राचा फोन आला. काजल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात नेत असल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर निता ढवळे यांनी आपला मुलगा ऋषीकेश आणि भाऊ सोमनाथ खंडागळे यांच्यासह ग्रामीण रुग्णालय गाठले. मात्र, तेथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी काजल यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. काजल या गळफास लागल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी मयत काजल यांच्या आईने दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

स्रोत:(खबर)

https://www.amazon.in/dp/B0F6CPK5YZ/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_A5MFQJGVV24QBKZ5DP45?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=39fd2623703d60accd3783d0af885be3

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading