रोगर कीटकनाशक प्राशन केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू..

दिनांक २० जून (लिंपणगाव,श्रीगोंदा):

१५ जून रोजी पहाटे ४:०० वा चे सुमारास फिर्यादीचा चुलतभाऊ कल्याण दत्तात्रय पवार रा. पवारवाडी लिंपणगाव ता. श्रीगोंदा जि. अ.नगर यांनी राहते घरात रोगर नावाचे विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्यांना श्रीगोंदा येथील होले हाँस्पीटल येथे औषधोपचारासाठी दाखल केले होते. दवाखान्यात औषधोपचार घेत असताना,आज २० जून रोजी सकाळी ९:०० वा चे सुमारास कल्याण दत्तात्रय पवार वय ५० वर्षे हे मयत झाले असल्याची खबर सुदाम पवार यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिली आहे.

सुदाम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बडे पुढील करीत आहेत.

Leave a Reply