बलुत.दया पवार(भाग ६)..

बलुत.

पितांना इतका त्रास होतो, तर हे का बरं पीत असावेत ! एक – दोन वर्षांतच आतड्याला भोकं पडली नसती तरच नवल . ह्यावर जेवण आपलं असंच – सटरफटर. पोटाची खळगी भरण्याएवढं . दिवसेंदिवस त्यांचं शरीर हल्लक होत चाललेलं .

आईची बहुधा ‘ तोंड दाबून बुक्क्यांचा मार ‘अशी अवस्था होत असावी . दादा तसे कोळशासारखे काळे . पण काळेपणाला शिसवी लाकडाची चमक . आई त्यांच्या मानानं खूपच उजळ . गव्हाळी रंगाची . दादा ताडमाड उंच, तर आई अटकर बांध्याची . दहा – बारा मुलं होऊनही तिच्या अंगकाठीत विशेष फरक पडला नव्हता . नऊवारी लुगडं नेसायची, अहेवलेणं म्हणून मोठं कुंकू लावायची. गळ्यात मात्र नेहमीच काळी पोत . कधीमधी डोरलं आणि दोन – चार सोन्याचे मणी . दागिना म्हणजे तरी काय ? हातात चांदीच्या बांगड्या . त्याही कधीकाळी दादा वाण्याकडे गहाण ठेवायचे . दादा प्याले म्हणजे ‘ दादा ‘ राहात नसत . मूर्तिमंत खवीस व्हायचे . अशा वेळी आई पुढं जात नसे . पण त्यांच्या प्रेमाचं इंगीत शेवटपर्यंत कळलं नाही. दादांबद्दल तिला काडीमात्र घृणा वाटायची नाही . पिशवीत असतील – नसतील तेवढे पैसे ती त्यांच्यापुढे मुकाट ओतायची. नशा उतरली म्हणजे ‘ दारूला पुन्हा शिवणार नाही ‘अशा आणाशपथा ते घेत . पण सकाळी घेतलेली शपथ संध्याकाळपर्यंत टिकायची. नाही . दादा चांगलेच बाहेरख्याली होते .

एक प्रसंग तर टळटळीत आठवतोय. बहुधा पगाराचा दिवस होता. घरी आले ते पिऊनच . आले ते पुन्हा ‘नाक्यावर जाऊन येतो ‘ ही सबब सांगून घराबाहेर पडण्याच्या तयारीनं. मी मागं लागतो आहे . मला बरोबरच घेऊन ते घराबाहेर पडतात . इराणी हॉटेलातील फॅमिली – रूममध्ये घेऊन जातात . बघतो , तो तिथं आधीच एक बाई बसलेली . काळीसावळी , ठसठशीत . त्या लहान वयातही हा काय प्रकार आहे हे माझ्या ध्यानी येतं . मी दादांना शिवीगाळ करू लागतो . ‘ असं करायचं होतं , तर मला कशाला आणलंत ? ‘ असं सुनावतो . ते माझ्या संवादाला गालातल्या गालात हसून दाद देतात . मी त्यामुळे जास्तच भडकतो . समोरची बाई आता माझ्याशी लाड घालते आहे . मला जवळ घेण्याचा प्रयत्न करते आहे . मी तिचा हात रागानं झिडकारतो आहे . वाटतं, ह्या बाईपेक्षा माझी आई किती तरी पटींनी सुंदर आहे. मग दादांनी असं का करावं ? मी थांबायला तयार नाही , असं पाहून दादा मला पुन्हा घरी आणून सोडतात . मी घरी आईला सारा प्रकार सांगतो , तेव्हा ती उदास हसते . तिला बहुधा याची कल्पना असावी . पुरुषानं रांडबाजी करणं म्हणजे आया , तर कुणी लॉरीवर मातीकाम करणाऱ्या . किती बदलल्या असतील , याला तर गणतीच नाही . दादांनी आईला , दारूच्या नशेतही , झोडपल्याचा प्रसंग पाहण्यात नाही .

एक प्रसंग आठवतो, तो वेगळ्याच कारणासाठी. त्यातून दादांच्या मनाचा एक वेगळा कोपरा उलगडत जातो. एकदा त्यांच्या अंगात काय आलं कुणास ठाऊक ? घरातील सर्वांना बाहेर काढलेलं. आत फक्त आई. त्यात दारं – खिडक्या बंद करून घेतलेल्या. बहुधा सखूचा आज घाम निघणार , ही चाळीतल्या बायकांची कुजबूज . मी रडकुंडीला आलेलो . आईचा मोठमोठ्यानं किंचाळण्याचा आवाज आणि दादांच्या काठीचे धपाटे . समोरच्या क्लबमधील यहुदी मंडळीही धावत आलेली . दादा बाहेरच्या धक्क्यांनाही दाद देत नाहीत . आता बहुधा सखू मरणार , ही बाहेर चिंता . यहुदी मंडळी दरवाजा तोडतात . आत जाऊन बघतात , तो दादा बिछान्यावर काठी आपटीत आहेत आणि आई कोपऱ्यात रडत आहे, हे दृश्य . बाहेरील लोकांना वाटावं , की बायकोला बडवतो आहे ; पण तसा प्रकार मुळीच नव्हता . एवढी वर्षे झाली , पण ह्या घटनेचा अर्थ मला कळू शकला आईला मुलीची फारच आवड होती.

माझ्यानंतर एक बहीण होऊन लहानपणातच वारली होती . त्यामुळं ती मुलीसाठी सारखी नवससायास करायची . सायनला जाऊन सटवाईची पूजा बांधायची . आईला मुलगी झाली आणि त्यानंतर लगेच माझ्या काकूची सतत आजारी असणारी मुलगी मेली . याचा सारा टोपरा आईवर आला . आईनंच काही तरी करणी करून आपली मुलगी मारली आणि स्वत : ची कूस उजवली असा जो काकूचा समज झाला , तो आयुष्यभर – म्हणजे आईला मातीआड लोटेपर्यंत – गेला नाही . पुढे आयुष्यभर दोन्ही जावांचं तुंबळ युद्ध पेटलं . त्या एकमेकींना पाण्यात पाहत . काकूच्या मनातला हा द्वेष आजही गेला नाही . तिनं सारं विसरावं म्हणून मी , बायकोनं परोपरी प्रयत्न केला ; पण तिच्या मनात एकदा बसलेली अढी निघाली नाही. एकदा – दोनदा ती घरी आलेली ; पण आमच्या घरातील थेंबभर पाणीही प्याली नाही ; खायचं तर दूर राहो . बहुधा आम्ही विष घालू किंवा करणी करू , असाच तिचा समज असावा .

एक – दोन वर्षापूर्वीची गोष्ट. कुणी तरी नातेवाईकानं मी गाडीखाली मेलो अशी भूमका मुंबईत फोडली . काकू आणि तिचे नातेवाईक रडत – ओरडत घरी आले . असं हे प्रेम ! तर काय सांगत होतो … बहिणीबद्दल . घरात माझ्यानंतर लहान मूल आल्यामुळं सर्वांनाच एक विरंगुळा झाला . तर कमालीचा जीव . तिचं नाव इंदू ठेवलं गेलं .अर्थात ज्या हॉस्पिटलमध्ये आई बाळंत झाली होती , तिथल्या नर्सनंच हे बहिणीचं नामकरण केलेलं . आईसारखाच बहिणीचा गोल चेहरा , तशीच उजळ रंगाची . अटकर माझीच मला शरम वाटावी , असे प्रकार दादा त्या वळी करत . त्यांचा पगार तुटपुंजा . त्यात त्यांची रांडबाजी . दारूचं व्यसन . तलफ भागविण्याकरिता पैशाची टंचाई सतत भासत असे . बोलके डोळे . सतत भासत असे . व्यसनं भागविण्याकरिता मग ते चक्क गोदीतून पितळ , तांब चोरून आणू लागले . गेटवर तसा कमालीचा बंदोबस्त . त्या सर्वांचा डोळा चुकवून ते बाहेर पसार होत . खिशाच्या झडतीत त्यांचा माल सापडणंच शक्य नसे . ते चक्क लंगोटीत माल बांधत . त्यांची चोरी जर सापडली असती , तर आज मलाही समाजात तोंड दाखवणं जड गेलं असतं . किती शोभा झाली असती त्यांची ? मला तो सारा प्रकार वाईट दिसत होता . पण सांगणार कोण ? तेवढं धाडस त्या लहान वयात शक्य नव्हतं . एकीकडे शाळेत मी ‘ बरे सत्य बोला ‘ असं शिकत होतो आणि दुसरीकडे दादांचा चोरीचा माल चोरवाजारात नेऊन विकत होतो . वास्तवाच्या जगापेक्षा शाळेचं जग खूपच नकली वाटायचं . जसं तसबिरीत नयनमनोहर चित्र टांगावं तस .

वस्तीत काय नव्हतं ? एक माणूस तर दररोज दहा रुपयांची नोट घरात छापवायचा . ती आम्ही गच्चीवर वाळवायचो . आमच्यापैकी कुणा तरी पोरासोराजवळ ती तो वटवायला द्यायचा . ह्या माणसाचा संयम असा , की तो जादा नोटा छापत नव्हता . आपला दिवसाचा खर्च भागला म्हणजे झालं . जादा हाव केली तर तुरुंगाची हवा खायला लागेल , याची त्याला कल्पना होती . असं होतं वस्तीचं जग . अशा जगात मी जर मोठा झालो असतो , तर आजचा बदल शक्यच नव्हता . कुणी सांगावं , मी त्यांच्यातलाच एक झालो असतो . पण दादांचं वाढतं व्यसन . आलेला पगार सारा कर्जदारांना वाटण्यात जायचा . डोक्यावर पठाणाचं कर्ज , हे सारं बहुधा दिवसेंदिवस असह्य होत चाललं असावं . एक दिवस ते तडकाफडकी नोकरीचा राजीनामा देतात . आलेला फंड , सर्व्हिस कर्जदारांना वाटतात आणि गावी जाण्याची योजना आखतात . दादांचं तत्त्वज्ञान तसं अजब होतं . ” नंगा आलो , नंगा जाणार ” असं ते दारूच्या नशेत असले म्हणजे बडबडत . त्यांनी आयुष्यात कधीच माया जमविण्याचा प्रयत्न केला नाही . गोदीतही ते चोरी करीत . ह्यात त्यांचं शास्त्र होतं . मोठ्या चोरीला ते हात लावत नसत . क्लबमध्ये खेळायला येणारा म्हातारा यहुदी त्यांच्या चांगलाच परिचयाचा होता , सुटाबुटातला तो गोरापान यहुदी घरी यायचा . हँट काढून गोधडीवर बसायचा . आमच्या घरचं मटणाच वरबाट खायचा . त्याचं तोंड , गाल तिखटामुळं लालीलाल व्हायचे . सारखा हाशहुश करायचा . त्याचा हिऱ्यांचा व्यापार होता . काही
क्रमशः

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading