नवीन तालुकाप्रमुख नियुक्तीमुळे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर..?

दिनांक ११ जून २०२४, श्रीगोंदा:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या जागी नवनियुक्त विजय शेंडे यांची तालुकाप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीमुळे बाळासाहेब दुतारे समर्थक व सहकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

बाळासाहेब दुतारे हे तळागाळात काम करणारे आणि सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करत आपले सामाजिक व राजकीय वलय श्रीगोंदा तालुक्यात निर्माण करणारे सच्चे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निकटवर्ती व संघटनेतील बरेच सहकारी यावर एकवटले आहेत की, दुतारे यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य चीज मिळाले नाही.

सामाजिक माध्यमांवरही या नेमणुकीविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक जण बाळासाहेब दुतारे यांच्या पद बदल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांनी त्यांच्या मेहनतीने व कर्तृत्वाने तालुक्यात आपले स्थान निर्माण केले होते आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे, असे मत त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केले आहे.

शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, बाळासाहेब दुतारे यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे आणि त्यांना जिल्हा कार्यकारिणीतील पद देण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, विजय शेंडे यांना तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

ही बदलती स्थिती शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुढे कशी ठरेल..? आणि दुतारे समर्थकांची नाराजी कशी निवळेल.? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..!

स्त्रोत:(सामाजिक माध्यमांवरील चर्चा)

जाहिरात..
जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading