दिनांक ११ जुन २०२४, श्रीगोंदा/अहमदनगर:
पंधरा दिवसांत सर्व अनाधिकृत होर्डिंग्ज काढणार – दि.ना.तारडे
शहरातुन राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी गेला आहे. या महामार्गावर जीवघेणे अनाधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आले आहे. सहा महिने पाठपुरावा करूनही काही होर्डिंग्ज मालकांना नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग पाठीशी घालत असल्याने शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मिराताई शिंदे यांनी आज ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्राणांतिक उपोषण सुरू केले. परंतु, उपोषणाला बसण्या पूर्वीच उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अहमदनगर दि.ना.तारडे यांनी शिंदे यांना १५ दिवसात राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी या महामार्गावर येत असलेले सर्व अनाधिकृत होर्डिंग्ज काढण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
शहरातुन राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी चे जाळे पसरले होते. या होर्डिंग्जमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये..! यासाठी सहा महिन्यांपूर्वी श्रीगोंदा नगरपरिषदे समोर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मिराताई शिंदे यांनी दोन दिवसीय उपोषण केल्यानंतर होर्डिंग्ज काढण्यात आले होते. परंतु, त्यापैकी काही होर्डिंग्ज मालकांना नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग पाठीशी घालत असल्याने उरलेले होर्डिंग्ज काढण्यासाठी दिनांक ३ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांना उपोषणा चे निवेदन दिले होते.
सन २०२१ मध्ये उपअभियंता, उपविभाग राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर यांनी नगरपरिषेला लेखी कळवले होते की, महामार्गाच्या हद्दीत जाहिरात फलक (होर्डिंग्ज) लावण्यास परवानगी देऊ नये. असे असतानाही शहरातील राहुल बलदोटा यांच्या व मलांग शाह मस्जिद ट्रस्ट यांच्या खाजगी गटात नगरपरिषेने परवानगी दिली.
वारंवार नगरपरिषेला विचारणा केली असता आम्ही ज्या गट नंबर मध्ये परवानगी दिली. त्या गटात होर्डिंग्ज उभारलेले नाहीत व जिथे आहेत ते महामार्गाच्या हद्दीत असल्याने त्यावर कारवाई राष्ट्रीय महामार्ग यांनी करावी असे उत्तर देत कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते.
शेवटी उपोषणाचे पत्र दिल्यानंतर नगरपरिषद जागी झाली व सदर होर्डिंग्ज आपल्या हद्दीत असल्याचे दिसून येत असून, काही दुर्घटना झाल्यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही असे कळविले व होर्डिंग्ज धारकांनी फसवणूक केली असताना त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी झटकली.
शेवटी १५ दिवसात सर्व होर्डिंग्ज पोलिस बंदोबस्त घेऊन काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मिराताई शिंदे यांनी उपोषण मागे घेतले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)


