दिनांक ११ जुन २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:
कोळगाव येथील सरपंच पुरुषोत्तम लगड व श्रीगोंदा तालुका भाजपाचे सरचिटणीस नितीन नलगे यांचे खंदे समर्थक गणेश लगड यांची श्रीगोंदा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. त्यांना तसे नियुक्त पत्र युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मयूर पंधरकर व भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिले.
श्री गणेश लगड हे लगडवाडी, कोळगाव येथील रहिवाशी असून आमदार बबनराव पाचपुते यांना मानणारे कट्टर भाजपा कार्यकर्ते आहेत. सामाजिक कार्याचा वसा घेतल्याने व छोटे-मोठे समाज उपयोगी त्यांनी कामे केले आहे. युवकांचा मोठा संग्रह त्यांच्याकडे असल्याने भाजपा तालुका युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल आमदार बबनराव पाचपुते, युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष नितीन नलगे, उपसरपंच संतोष मेहत्रे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लगड, विलास शितोळे, धोंडीबा लगड, मधुकाका लगड, दादासाहेब लगड तसेच इतर कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)


