कोळगाव परिसरात मृग नक्षत्राच्या सरी बरसल्या ..

दिनांक ७ जुन २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले व कोळगाव परिसरात अनेक वर्षानंतर प्रथमच मृग नक्षत्रावर पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

३० मे रोजी केरळ येथे आगमन झाल्यानंतर पुढील आठ दिवसात मान्सूनचे साधारणतः महाराष्ट्रात आगमन होत असते. परंतु, गेल्या कित्येक वर्षात सात जून ला मान्सून वेळेवर बरसला नाही. यावर्षी मात्र मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने ७ जून रोजी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सरी बरसल्याने नागरिकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

जाहिरात..

अनेक वर्षांनी मृग नक्षत्रावर वेळेवर पाऊस झाल्याने मागील आठवणी जाग्या झाल्या. गेल्या काही वर्षांपूर्वी मान्सून ७ जून रोजी महाराष्ट्रात दाखल होऊन हमखास पाऊस पडत असे. परंतु तो काही वर्षापासून वेळेवर पडत नव्हता. यावर्षी वेळेवर आगमन झाल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. नांगरट करणे, काक्री पाळी घालणे, वापसा झाल्यानंतर पेरणीसाठी बी बियाणे, खते, औषधे खरेदी करणे यासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्राकडे धाव घेतली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला असून, असाच वेळेवर पाऊस पडू दे अशी तो प्रार्थना निसर्गाकडे करत आहे.

यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लगेचच कापूस, तूर, मुग, मका, उडीद, सोयाबीन व इतर खरिपाच्या पेरणीसाठी लागणारी बी बियाणे, खते, औषधे यांची मागणी चालू केल्याने खरीप हंगाम सुरू झाल्याची संकेत यातून मिळत आहे. भारतातील शेतकऱ्यांचे भवितव्य मान्सून चक्रावर अवलंबून असल्याने वेळेवर पाऊस होणे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. (श्री उत्तम लगड व सागर नलगे, कृषी सेवा केंद्र, कोळगाव..)

जाहिरात..

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

Leave a Reply