शिवदुर्गचे बारव श्रमदान अभियान.

दिनांक ७ जुन २०२४, श्रीगोंदा:

महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचा एक महत्वाचा उपक्रम ४२ वी बारव श्रमदान मोहीम पार पडली. इतिहास काळापासून श्रीगोंदेकरांचे ईमान रायगडच्या मातीशी आहे. तीच जुळलेली नाळ शिवदुर्ग परिवार पुढे घेऊन जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या वतीने “महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत” अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख अमोल बडे, सागर शिंदे, सचिन भोसले, तुषार चौधरी यांच्या नियोजनात श्रीगोंदा खंडोबा मंदिर बारव येथे २१ एप्रिल ते ६ जुन या कालावधीत प्रत्येक राविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत बारव श्रमदान मोहीम राबविण्यात आली.

कोणतेही यंत्र न वापरता फक्त शारीरिक श्रमदान करून या मोहिमे दरम्यान सात फूट गाळ, माती, दगडगोटे बाहेर काढण्यात आले. पाच ट्रेलर दगडी तोडी दोरीच्या साहाय्याने वर काढल्या.

जाहिरात..

३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने श्रीगोंदा तालुक्यांतील सरस्वती नदी किनारी आसलेल्या खंडोबा मंदिरा समोरील पुरातन बारव काटेरी झुडपांनी वेढलेली व प्लॅस्टिक कचऱ्याने भरलेली बारव मोकळी केली. प्रत्येक मोहिमेत खंडोबा, श्रमदान साहित्याचे व बारवचे पुजन करून श्रमदानास सुरूवात केली. वेड्या बाभळी, काटेरी झुडपे, व खुरटी झुडपे, गवत, माती, निर्माल्य, प्लॅस्टिक बाटल्या  बारवेतून बाहेर काढण्यात आल्या. संपूर्ण बारवेने कित्येक वर्षांनंतर पुन्हा नव्याने मोकळा श्वास घेतला.

श्रीगोंदा तालुक्याला बारवांचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. श्रीगोंदा तालुक्यात ११५ पेक्षा जास्त बारव आहेत. अशी नोंद नव्याने प्रकाशित झालेल्या “वैभवशाली ऐतिहासिक श्रीगोंदा” या पुस्तकात घेतली आहे. बारव संवर्धन मोहिम पुढील काही वर्षे चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने निर्माण केलेला हा वारसा आहे. भविष्यातील दुष्काळाची दाहकता कमी करणाऱ्या या बारवा आहेत. तालुक्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी सर्व श्रीगोंदेकरांनी शिवदुर्ग परिवाराला साथ द्यावी. असे आवाहन शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी  केले.

या स्वच्छता मोहिमेत डॉ. चंद्रशेखर कळमकर, भरत खोमणे, मारूती वागस्कर, दिगंबर भुजबळ, ऍड.गोरख कडूस, प्रणव गलांडे, सचिन भोसले, अक्षय गायकवाड, नितिन शेळके, अजित लांडगे, ईश्वर कोठारे, अक्षय ओहळ, शंकर जंबे, रहिम हवालदार, अजित दळवी, संगीता इंगळे, सुप्रिया कुदांडे, तारा चांदगुडे, विजया लंके तनिष्का कळमकर, अर्चना बडे, मच्छिंद्र लोखंडे, अतुल क्षीरसागर, ऋषिकेश इंगळे, आविष्कार इंगळे, ओम तावरे, रमेश चांदगुडे, राम डोळे, संतोष रोकडे, नवनाथ खामकर, प्रमोद कुलकर्णी, अविनाश नवले, अशोक शिंदे, नीरज पाडळे, राहुल म्हस्के, संतोष तांदळे, विकास तरटे, मल्हारी शिर्के, संतोष कदम यांनी सहभाग नोंदवला.

जाहिरात..

जय मल्हार यात्रा कमिटीच्या वतीने बाळासाहेब खेतमाळीस व ईतर विश्वस्तांनी सहकार्य केले. शिवदुर्ग मधील अनेक सदस्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने  श्रमदान करणाऱ्या सदस्यांना मोफत अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

यांत्रिकी करणाच्या युगात आजकाल शिकलेली तरूण पिढी श्रमदान करण्यास इच्छूक नसते. आपल्या पूर्वजांनी मोठया कष्टाने निर्माण केलेला वारसा आपणच जतन केला पाहिजे या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या विचारांना साथ देण्यासाठी भर उन्हाळ्यात तरुणांनी घाम गाळून बारव श्रमदान केले. असे तालुका प्रमुख अमोल बडे यांनी सांगितले.

“शिवदुर्ग परिवारातील तरुणाई, महिला, मुले, वयोवृध्द यांनी श्रमदान करून श्रीगोंदेकरांपुढे वेगळा बारव स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला. बारवेचा कित्येक वर्षे गुदमरलेला श्वास मोकळा करण्यात यश मिळवले आहे. आगामी काळात जीवंत पाण्याचे झरे मोकळे करण्याचें काम केलें जाईल. असे शिवदुर्गचे बारव प्रमुख सचिन भोसले यांनी सांगितले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading