श्रीगोंद्यात ५० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या..

दिनांक ७ जून २०२४ श्रीगोंदा:

शहरात श्रीराम नगर परिसरातील रहिवाशी सखाराम श्रीरंग नवले या ५० वर्षीय इसमाने दिनांक ७ जुन रोजी सकाळी १०:०० वाजनेपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या वक्तीने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला रस्सीच्या साह्याने गळफास घेऊन जिवन संपवले आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत आदिनाथ सखाराम नवले यांनी खबर दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मृतकाच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवन्यात आले आहेत.

स्थानिकांनीही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नवले कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे खरे कारण काय होते, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

स्रोत:(आकस्मित मृत्यूची नोंद)

जाहिरात..
जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading