दिनांक ३० जानेवारी, श्रीगोंदा:
अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसीचे युवा कार्यकर्ते तथा भूमिपुत्र प्रतिष्ठान व मल्हार छावा संघटनेच्या माध्यमांतून सामाजिक कामात अग्रेसर असणारे, आदेश शेंडगे पाटील यांना युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्त करावे, अशी मागणी समाज बांधव, विद्यार्थी तसेच तरून कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांकडून होत आहे.

श्रीगोंदा तालुका कार्यक्षेत्रात सामाजिक प्रक्रियेमध्ये सामान्यांच्या विविध अडचणी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सक्रिय असणारे युवा कार्यकर्ते आदेश शेंडगे पाटील यांना राजकीय मंचावर काम करण्याच्या उद्देशाने तसेच साधारण माणसांसह युवकांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक विषयांमध्ये पाठपुरवा करण्यासाठी शेंडगेंची तालुक्यातील काही सामाजिक संघटना व ग्रामस्थांकडून युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्तीबाबत मागणी होत असल्याचे समजते आहे.
अनेक सामाजिक व जन कल्याणाच्या प्रश्नांसह सर्वसामान्यांच्या विविध आंदोलनांमध्ये सक्रिय रित्या व आंदोलनात्मक पवित्र्यात उतरणारे आदेश शेंडगे पाटील हे तालुक्यास धडाडीचे युवा कार्यकर्ते म्हणून माहित आहेत. वंचित, शोषित, पीडित समाज बांधवांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आवाज उठवणे, त्यांचे प्रश्न मार्गी लावणे, सर्वसाधारण माणसांच्या मूलभूत सुविधांसाठी आंदोलनातून विषय हाताळत ते पूर्ण करण्यात शेंडगे नेहमी पुढे असतात. म्हणून, या लढवय्या आणि सक्रिय कार्यकर्त्याला युवक काँग्रेसच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदाची जिम्मेदारी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
स्रोत:(ग्रामस्थ भिंगान, धनगर समाज श्रीगोंदा तालुका, मल्हार छावा संघटना, अजिंक्य चोरमले, उपाध्यक्ष श्रीगोंदा तालुका विध्यार्थी काँग्रेस)

