दिनांक ३१ जानेवारी, श्रीगोंदा
उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा. अशी मागणी करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनामार्फत परवानगी देण्यात आलेली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात सर्व जाती-धर्माच्या जनतेसाठी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत लोककल्याणकारी कार्य केलेली आहे व त्यांचे आजोळ हे जिल्ह्यातील चोराखळी हे ठिकाण आहे. त्यांचे नाव महाविद्यालयाला दिल्यास, तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ते वाटचाल करतील. त्यांचे नाव महाविद्यालयाला देऊन, त्यांच्या कार्याचा गौरव करावा. अशी मागणी मल्हार छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे पत्र लवकरच नामदार बाळासाहेब थोरात यांना देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(आदेश शेंडगे पाटील, संस्थापक अध्यक्ष, मल्हार छावा संघटना/भूमिपुत्र प्रतिष्ठान)
