स्वतःच्या आजरापेक्षा मुलीच्या उपचाराला महत्व देत, तिची शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या बापाच्या प्रयत्नांना सॅल्युट…

मूकबधिर मुलीच्या उपचारासाठी आजारी बापाची धडपड.. शस्त्रक्रियेनंतर मुलगी लागली बोलू..

दिनांक १ फेब्रुवारी(भिंगाण खालसा दुमाला,श्रीगोंदा):

तालुक्यातील भिंगाण खालसा दुमाला या गावांमध्ये मुलींचे जन्मप्रमाण मुलांपेक्षा जास्त. आहे. त्यात येथील एका गंभीर आजाराने पीडित असलेल्या बापाने अनेक प्रयत्नानंतर मूकबधिर मुलीचे ससून रुग्णालयात उपचार केले असून, शस्त्रक्रियेनंतर ती मुलगी बोलू लागली आहे. या घटनेनंतर भिंगाण गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील भिंगाण गावांमधील महेंद्र विठ्ठल शेंडगे हा आजारी बाप व त्यांच्या कुटुंबाने आपल्या मुलीला एक – दीड वर्ष झाले, बोलता येत नसल्याने काळजी करू लागले होते, अनेक वेळा पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये मुलीची तपासणी केली. त्यात, तीचे वडीलही नेहमी आजारी असत, स्वतःच्या आजाराची चिंता बाजूला सोडत, मुलीला बोलता, ऐकता येत नाही. या तणावामध्ये महेंद्र शेंडगे व त्यांच्या पत्नीने पुणे येथील ससून रुग्णालयात मुलीवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले व त्यानुसार तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ही मुलगी बोलू, ऐकू लागली. आई वडिलांच्या प्रयत्नांना यश आले. यानंतर कुटुंबाचा आनंद गगणात मावेना झाला आहे.

आजारपणात मुलीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वतःच्या आजारपणापेक्षा मुलीच्या उपचाराला प्राधान्य देत, तिची शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या बापाच्या प्रयत्नाला संपूर्ण भिगाण गावाने सॅल्युट करीत, आनंद व्यक्त केला आहे.

स्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading