दिनांक ३ सप्टेंबर,श्रीगोंदा:
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व माई सावित्रीआई फुले यांनी सुरू केलेली देशातील पहिली शाळा भिडेवाडा पुणे या ठिकाण सुरू करण्यात आली होती. या ऐतिहासिक वास्तूचे पुनर्वसन होऊन समाजाला एक सामाजिक संदेश मिळावा या उद्देशाने हे ठिकाण स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे, असे निवेदन आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी श्रीगोंदयातील समाज बांधवांनी स्थानिक प्रशासनास सादर केले. नमूद ठिकाण शासनाने तात्काळ भूसंपादन करून, राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथे सुरू झाल्याचे सर्वश्रुत आहे. महात्मा जोतीराव फुलेंनी १ जानेवारी १८४८ साली मुलींची पहिली शाळा येथे काढली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचली. ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडीचणींचा सामना करून विरोध पुकारून देशात मुलींसाठी भिडेवाडा येथून शिक्षणाचे दारे खुले करून दिले. त्या भिडेवाड्याची अवस्था आज खुपच दयनीय झालेली असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. या ठीकाणची दुरावस्था होणे तमाम फुले अनुयायांसाठी वेदनादायक आहे. तसेच, भिडेवाडा पुणे येथे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती, त्या बाबतचा उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामध्ये शासनाने स्वताःहुन हजर व्हावे व ते प्रकरण लवकारात लवकर निकाली काढण्यासाठी योग्य ते शासन स्तरावर प्रयत्न करावे, नमूद जागा शासनाने भुसंपादित करून, म. फुलें विषयी आदर असणाऱ्या जनतेला न्याय द्यावा, त्या वास्तूस राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करावे, अश्या विविध मागण्या वेळोवेळी शासनाकडे करूण देखील शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याविषयी शासनाने दखल घेत भिडेवाडा पुणे ही जागा शासनाने भुसंपादित करून, राष्ट्रीय स्मारक घोषीत करून विकसीत करावे. अन्यथा शासनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात “आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती”च्यावतीने राज्यभर जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यात देण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासनास निवेदन देताना विकास भुतकर, राजू गोरे (माजी उपनगराध्यक्ष व तालुका अध्यक्ष सावता परिषद) सूनिलकुमार शिंदे, विजय खेतमाळीस, ऋषिकेश गायकवाड, योगेश म्हत्रे (शहराध्यक्ष काँग्रेस) व गोरख आळेकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
स्रोत:(राजू गोरे यांनी प्रसिध्दीस दिलेले निवेदन)
