स्मृतिशेष सुभाष विष्णु घोडके यांना जलदान विधी कार्यक्रमात मान्यवरांची श्रद्धांजली..

दिनांक ९ जुन २०२४ श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी आणि फळं व्यवसायात कार्यरत सुभाष विष्णु घोडके यांचे दोन दिवसांपूर्वी दुर्दैवी निधन झाले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात शहरातील व परिसरातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सुभाष घोडके यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यावेळी सिद्धार्थ नगर, ससाणे नगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधीनंतर अन्नदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला.

सुभाष घोडके यांच्या पश्चात पत्नी, मुलं, मुली, नातवंड असा मोठा परिवार आहे. सिद्धार्थ नगर येथे त्यांनी महापुरुषांच्या आणि संतांच्या जीवन चरित्रावर अभंग आणि गीत प्रबोधन केले. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, तथागत भगवान बुद्ध जयंती निमित्त आयोजित धम्म यात्रा उत्सव आणि इतर विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपले योगदान दिले.

बराच कालखंड त्यांनी फळ विक्री आणि या संलग्न व्यवसायात आपला वेळ खर्च घातला. अर्धांगवायु आजाराने ग्रस्त असल्याने ते घरीच उपचार घेत होते. परवा पुणे येथे त्यांची प्राणजोत मालवली. ‘बहुजन समता पत्र’ वृत्तपत्रातर्फे सुभाष घोडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

स्रोत:(जलदानविधी कार्यक्रम)

जाहिरात..
जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading