विजेचा तुटवडा.. बंद जनरेटरमुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील प्रशासकीय कामांचा खोळंबा.. लोकांची गैरसोय.. कर्मचाऱ्यांचेही होतात हाल..

दिनांक ९ जून २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दररोज अदखलपात्र, दखलपात्र, गुन्हे दाखल करण्यासह विविध प्रशासकीय कामकाज चालू असते. तालुका कार्यक्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ पाहण्यास मिळते. मात्र, सध्या चालू असलेले पावसाळ्याचे दिवस आणि त्यात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या अडचणींमुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लोकांच्या कामाची गैरसोय होताना समोर येत आहे.

आऊट सोर्स कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे वीज वितरण कंपनीकडूनही मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होत आहे. शहरातील शनि चौक परिसरात याचा मोठा फटका बसताना दिसतोय. याच परिसरात सर्व प्रशासकीय कार्यालये आहेत. यात पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय इत्यादी कार्यालय असणाऱ्या ठिकाणी दररोजच विजेचा लपंडाव पाहण्यास मिळत आहे. आणि लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्याची हद्दही मोठी असल्याने तालुक्यातील नागरिक या ठिकाणी आपल्या तक्रारी नोंद करण्यासाठी येतात. विजेचा पुरवठा खंडित झाल्यानंतर पोलीस स्टेशन मधील प्रशासकीय जनरेटर अनेक दिवसांपासून बंद असल्याने पोलीस स्टेशन कार्यालयाची सर्व यंत्रणा वीज गेल्यानंतर बंद पडत आहे. सीसीटीव्ही, ऑनलाइन तक्रारी, ऑनलाइन गुन्ह्यांच्या नोंदी, गुन्ह्यां संदर्भातील काम, प्रिंट यामुळे खोळंबले जात आहेत.

तसेच उन्हाळा आणि पावसाळा दरम्यान वातावरणात असलेली आर्द्रता यामुळे कर्मचाऱ्यांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. पत्र्याखाली उष्णतेमुळे बराच काळ थांबता येत नसल्याने झाडाखाली बाहेर बसावे लागत आहे व कामाचा लोडही यामुळे वाढत आहे. त्यामुळे सदर जनरेटर दुरुस्त करून देण्यात यावे जेणेकरून सर्व कामं पूर्ववत करता येतील, अशी अपेक्षा येथील कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

स्रोत: (मिळालेल्या माहितीनुसार)

जाहिरात..
जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading