शेख महमंद बाबांच्या यात्रेत भडकाऊ भाषणं करणाऱ्या नेत्यांचा पोलिसांकडे खुलासा.. आम्ही बेकायदा कृत्य करणारं नाही.. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारांवर पोलिसांकडून कडक कारवाईचे संकेत..

दिनांक ९ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

सुफी संत शेख महमंद बाबा यांच्या उरुस/यात्रा उत्सवात आयोजित सामाजिक कार्यक्रमात दिनांक १८ मार्च रोजी सप्ताह सांगता समारंभातील काल्याच्या कीर्तनानंतर काही राजकीय नेत्यांनी व यात्रा कमिटीच्या सदस्यांनी उपस्थित जनसमुदायासमोरं लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करीत चिथावणी देनारी भाषणं केली होती. कायद्यालाही त्यांनी धाब्यावर बसवत लोकांसमोर असंवेदनशील वक्तव्यं केले होते. त्यावेळी स्थानिक प्रशासनाचे सर्व अधिकारी नमूद ठिकाणी कर्तव्यावर होते.

यातील काही पुढाऱ्यांनी एप्रिलच्या ९ तारखेपर्यंत दर्ग्यात वास्तव्यास असणाऱ्या शेख महमंद बाबांच्या वंशजांना बाहेर पडण्यास मुदत दिली होती. अन्यथा स्वयंघोषित काही कारवाई करण्याचे आश्वासन सर्वांसमोर देऊन जनभावना उद्देपित करण्याचे काम केलते. याबाबत तक्रारी अर्ज पोलीस अधिक्षक राकेश ओला आणि जिल्हाधिकारी सिद्धराम सालेमठ यांना देण्यात आले होते.

त्यानूसार काल दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी स्थानिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी भडकाऊ आणि प्रक्षोभक भाषण करणाऱ्या पदाधिकारी आणि यात्रा कमिटीच्या सदस्यांना पोलीस ठाण्यात बोलवुन याबाबत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे संकेत दिलते. या अनुषंगाने नमूद नेत्यांनी आणि यात्रा कमिटीच्या सदस्यांनी आम्ही असे काही बेकायदा कृत्य करणारं नसल्याचे लेखी आश्वासन प्रशासनास सादर केले असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.

दुर्बल, मागास आणि अल्पसंख्यांक समुदाय या पुढाऱ्यांच्या निशाण्यावर:
अनेक कालखंडापासून श्रीगोंदा शहरात वास्तव्यास असणाऱ्या आणि तालुक्याच्या विविध ठिकाणचे रहिवाशी असलेले नेते शहराच्या सामाजिक प्रक्रियेत हस्तक्षेप करीत सलोख्याचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी याच्या मुळाशी भरडणारे दुर्बल, मागास आणि अल्पसंख्यांक समाजातील लोकं आहेत असे दिसते.

आपले वर्चस्व आणि राजकीय समीकरण जुळवण्यासाठी सदरील नेते सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी नमुद समाजातील लोकांच्या चुकांवर बोट ठेवन्याचा प्रयत्न करीत, सबंध समाजाला टार्गेट करतात. दोन समाजात तेढ निर्माण करून त्यानंतर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आंदोलन घडवुन आणतात.. त्यातुन जमलेल्या जमावांना भडकवण्यासाठी हेच सूचना आणि आव्हान करतात. तसेच प्रक्षोभक जमावाला नियंत्रणात ठेवण्याचे पुढारपण हेच करतात.. त्यामूळे काहीकाळ शहरात व तालुक्यांत सामाजिक वातावरण दूषित होते. कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते.

कोणते आहेत ते उदाहरणं ज्यात नेत्यांनी भडकाऊ भाषा वापरत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा अट्टाहास केला..?
सन २००१ साली झालेल्या यात्रेतील किरकोळ वादाला केंद्रित करून येथील मागास प्रवर्गातील लोकांना छळण्याचे कामं याच राजकारण्यांनी केले. आजही सामाजिक अस्थिरतेला येथील समाजाला सामोरे जावे लागत असुन, दोन समाजात निर्माण झालेली तेढ अजूनही जाणवते.. आणि याचच भांडवल हे पुढारी अनेक ठिकाणी करतांना स्पष्ट होत आहेत.

सन २००८ साली शेख महमंद बाबा यांच्या दर्ग्याचा जीर्णोद्धार करण्याच्या तयारीत लोकांना चिथावणी देत दर्ग्यात वास्तव्यास असलेल्या लोकांना जबरदस्ती बाहेर काढत, त्यांच्यावर निरनिराळे आरोप करून, भर यात्रेच्या दिवशी जेल मध्ये ठेवले.. याप्रकरणातुन जनभावना भडकल्या आणि लोकांचा प्रतिसाद जीर्णोद्धाराच्या नावाखाली या नेत्यांना मिळत गेला. सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ असुन, मा. न्यायालयाच्या विविध सूचना व आदेशांना झुगारून हे पुढारी आजही आपली री.. ओढताना दिसत आहेत.

महंमद बाबांवर श्रद्धा दाखवणारेच त्यांचे अवमुल्यांकन करतात:
सुफी संत शेख महमंद बाबा तसेच, संत शेख महमंद महाराज हया दोन्ही भावना एकच आहेत. मात्र, शांतीचं आणि राष्ट्रीय ऐक्याच प्रतिक असणाऱ्या महमंद बाबांवर श्रद्धा आणि उपासना असणारे काही लोकं त्यांचे अवमुल्यांकन करतात..? कारण.. एकीकडे ते महंमद बाबांवर श्रद्धा दाखवतात आणि दुसरीकडे त्यांच्याच वंशजांना मंदिर/दर्ग्यातून बाहेर काढण्याची भाषा वापरतात.. ! ही त्यांची कृत्रिम श्रद्धा आहे. त्यात काहीतरी स्वारश्य असल्याचे बऱ्याच लोकांचे मत आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध:
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना नमूद प्रकरणी माहिती विचारली असता, त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. अन्यथा कायदेशिर कारवाईला सामोरे जावे लागले. असे आवाहन pi भोसले यांनी केले आहे.

स्त्रोत:(अधिकृत माहितीच्या आधारे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading