सनराईज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना ( NSS) विभागा कडुन 500 मास्कचे वाटप

दिनांक १७ एप्रिल(मढेवडगावश्रीगोंदा):

जगभरात मध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारत देशात अनेक दिवसां पासून लॉक डाऊन केले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कूठे तरी त्यामुळे कमी होताना दिसतं आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था त्यामध्ये डॉक्टर-नर्स- कलेक्टर-तहसीलदार-पोलिस-यांचे युध्द पातळीवर कामं चालू आहे. या सर्वांचे कामं लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) चे प्रमुख श्री प्रभाकरजी देसाई व अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्ह्या समन्वयक सौ.भारती मॅडम यांनी व (श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार) श्री.महेंद्रजी माळी,(पोलिस निरीक्षक) दौलतराव जाधव साहेब यांनी महाविद्यालयास व विद्यार्थ्यांना केलेल्या सूचनेच्या माध्यमातुन आप-आपल्या महा विद्यालयातील NSS विभागातील आजी-माझी विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनास महत्वपूर्ण सहकार्य करावे व आप-आपल्या गावातील परिसरातील स्थानिक गोर – गरीब गरजू कुटुंबांना या परस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन हवी त्या मदतीचे सहकार्य आपल्या माध्यमातुन करावे. कोरोना विषाणू बद्दल जन जागृती करावी.ही सर्व भावना लक्षात घेऊन,सनराईज महाविद्यालयाने श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव परिसरात 500 मास्कचे वाटप गरजू लोकांना केले आणि त्याच बरोबर मास्क हा तोंडाला का लावावा याचे महत्व नागरिकांना पटवून आरोग्या विषयी माहिती दिली.

यावेळी सनराईज महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सतीशजी शिंदे यांनी ही मदत केली.राष्टीय सेवा योजनेचे (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा.गोरखजी उंडे यांच्या उपस्थितीत मास्कचे वाटप करून social Distance ठेवण्याचे आव्हान नागरिकांना केले त्यांनीं केले..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading