अग्नीपंख फौंडेशनतर्फे आदिवासी कुंटुबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप.

दिनांक ९ एप्रिल(वलघुड,श्रीगोंदा):

श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने मांडवगण गटातील वडघुल येथे आलेल्या बुलढाणा जालना जिल्ह्यातील मजुर व परिसरातील कामठी, खांडगाव येथील आदिवासी कुंटुबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून या नागरिकांना दिलासा दिला.

हे वाटप(तहसीलदार)महेंद्र महाजन,(तालुका वैद्यकीय अधिकारी)डॉ.नितीन खामकर, बाळासाहेब महाडीक,शरद कुंदाडे,राम घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.

मांडवगण गटातील दुष्काळी भागात एका बाजुला कोरोनाची संचारबंदी आणि दुसऱ्या बाजूला पाणी टंचाईने शेतकरी व मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे,बरेच कुंटुब सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत. अग्नीपंख फौंडेशनने या परिसरातील नागरिकांना मदत करण्याचा उपक्रम राबविला आहे.

तहसीलदार महेंद्र महाजन म्हणाले कि,मांडवगण गटातील खरोखर आडचण असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी दानशुर नागरिक व संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.

बुलढाणा येथून कामासाठी आलेल्या मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना तहसीलदार महेंद्र महाजन,डॉ.नितीन खामकर,पुरवठा अधिकारी पाचर्णे भाऊसाहेब,शरद कुंदाडे,राम घोडके,बाळासाहेब महाडीक सह वंचित समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading