संकटात गरीब कुंटुबांतील लेकरांना दोन घास भरवावेत या भावनेने मदत.

दिनांक ९ एप्रिल(येळपणे,श्रीगोंदा):

देवदैठण येथील पंचायत समिती सदस्या कल्याणी व उद्योजक अतुल लोखंडे या दापत्यांनी लॉकडाउनमुळे उपासमार होत असलेल्या,येळपणे गटातील २० गावातील १ हजार ५०० कुंटुबांना सुमारे दहा लाख रुपयाच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली.

श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा हिंगणी गावात शुभारंभ करण्यात आला. लोखंडे यांची टीम दोन दिवसांत घरोघरी जाऊन २० गावातील या कुंटुबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहे. याविषयी तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले की, लोखंडे दांपत्यांनी सुमारे दीड हजार कुंटुबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.यांतून गरजू लोकांना आधार मिळणार असून,सामाजिक बांधिलकी तुन असे उपक्रम तालुक्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अतुल लोखंडे यांनी कोरोनाचे संकट महाभयानक असून,देश एका जागेवर उभा आहे. गरीब कुंटुबांतील लेकरांना दोन घास भरवावेत या भावनेने मदत केली असल्याचे नमूद केले आहे. यावेळी कल्याणी लोखंडे, संतोष टिळेकर, तुषार लोखंडे, माऊली शिंदे, सुरेश शिंदे, सोमनाथ वाखारे व नवनाथ शिंदे उपस्थित होते.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading