‘एक घास भावी अधिकाऱ्यांसाठी’ या संकल्पनेसह त्यांच्या माणुसकी व कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक..

दिनांक ८ एप्रिल, पुणे:

‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे राज्य – भरातील विद्यार्थी पुण्यामध्ये अडकून पडले. त्यामुळे त्यांच्या जेवणाची मोठी गैरसोय निर्माण झाली.

यावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. बरेचजण स्वतः ला व कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यात गुंतले.मात्र, आशा कठीण काळात दोन तरुणांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीचा हात देत विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली आहे. किरण निंभोरे (श्रीगोंदा) आणि महेश बढे (सोलापूर) अस त्यांचं नाव असून,सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून ते गरजूंची अखंडपणे जेवणाची सोय करत आहेत.

गेल्या अकरा दिवसांपासून हे दोघे सामाजिक भावनेतून त्यांच्या समविचारी ३०-३५ सहकाऱ्यांच्या मदतीने, पुण्यात २१ ठिकाणी २ वेळचे जेवण साधारण २००० विद्यार्थ्यांना पुरवत आहेत. प्रशासनाच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करत.दिवसातले १० ते १२ तास त्यांनी स्वतःला याच कामात वाहून घेतले आहे.

मागील एक दशकापासून ‘पुणे शहर’ स्पर्धा परीक्षांचे केंद्रस्थान बनले आहे. सदाशिवपेठ, नारायणपेठ या केवळ ३ कि.मी.च्या परिघातच ५० ते ५५ हजार विद्यार्थी मुक्काम करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. स्पर्धेच्या आणि करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर विद्यार्थ्यां समोर नवनवीन आव्हाने आ वासून उभी असतानां, अशावेळी अवाढव्य आणि धावत्या शहरात, विद्यार्थ्यांना आपलं म्हणून आपल्यातली वाटणारी किरण निंभोरे आणि महेश बढे ही दोन व्यक्तिमत्वे ‘आधाराचा हात’ देत आहेत.

महेश आणि किरण या दोघांनी त्यांचे समविचारी मित्र बरोबर घेऊन ‘MPSC स्टुडंट राईट्स’ या संस्थेच्या माध्यमांतून गेली दोन-तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेतील अनेक प्रश्न मार्गस्थ केले आहेत. समवयस्कर विद्यार्थ्याने खानावळीपासून तर परिक्षा फी पर्यंतचा विषय घेऊन मंत्रालय गाठले आहे. आज या दोघांच्या “एक घास भावी अधिकाऱ्यांसाठी” या संकल्पनेसह त्यांच्या माणुसकी व कर्तृत्वाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.अधिक माहिती व मदतीसाठी किरण निंभोरे. :(8484086061) महेश बढे.:(9158248484) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading