दिनांक ८ एप्रिल (लोणीव्यंकनाथ,श्रीगोंदा):
दौण्ड येथील प्रसिद्ध सर्जन डॉ.जयराम सोनोने यांनी लोणीव्यंकनाथ येथील मृत्यूशी झुंज देत असलेल्या,चांगदेव गावडे या निराधार वृध्द बाबांकडून एक रुपयाची अपेक्षा न करता.पोटाची शस्त्रक्रिया करुन,त्यांना जीवदान दिले आहे.
राहायला झोपडपट्टी व उदरनिर्वाहासाठी एक शेळी वयाची ६० वर्षे पार केलेले.चांगदेव गावडे हे लोणीव्यंकनाथ येथील डॉ.विनोद यांच्याकडे आले. त्यावेळी,चांगदेव गावडेंची परिस्थिती भयानक होती.अपेंडीस काही तासात शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नव्हता.शस्त्रक्रिया करण्यासाठी पैश्याचा प्रश्न होता.
अग्नीपंख फौंडेशन चे लाईफ मेंबर डॉ.विनोद काकडे यांनी गावडेंना दौंडला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला.बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी तातडीने गाडीची व्यवस्था केली.
डॉ.विजय टुले डॉ.अरविंद नांगरे यांनी चांगदेव गावडे यांची तातडीने सोनोग्राफी केली.अपेंडीस निघाले पण विनापैशाची शस्त्रक्रिया कोण करणार? डॉ.सोनोने यांनी पैशापेक्षा गावडे बाबांचे प्राण वाचविण्यासाठी भुमिका घेतली.एक तासात शस्त्रक्रिया केली.गावडे बाबा जवळ राहण्यास कोणी नाही म्हणून दोन आरोग्य सेवकांची नेमणुकही केली.अश्या बिकट परिस्थितीत असलेल्या चांगदेव गावडेनां डॉ सोनवणे यांचा पुढाकाराने जीवदान मिळाले.
पैश्या पेक्षा जीव महत्त्वाचा..
कोणतेही काम करायचे असेल तर पैसा लागतोच. पण,कधी कधी पैशापेक्षा माणसाची परिस्थितीत त्याच्या जीवनमरणाचा विचार करावा लागतो. चांगदेव गावडे यांच्या बाबतीत तोच विचार केला..
डॉ.जयराम सोनोने,दौड.
