दिनांक ७ एप्रिल श्रीगोंदा :
“एक हात भूकेलेल्यांची भूक भागवण्यासाठी” या थोर महापुरुषांच्या वाक्याप्रमाणे श्रीगोंदा शहरात मागील एक महिन्यापूर्वी यात्रे निमित्ताने आलेले पाळणे वाले कुटुंब कोरोना विषाणूच्या महामारी मध्ये पर राज्यातील हे कुटुंब देशभर हे लोकडाऊन झाल्याने,श्रीगोंदा शहरात अनेक दिवसांपासून अडकून पडले आहेत.त्यामळे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपास मारीची वेळ आलेली होती.हा त्या कुटुंबावर ओढवलेला प्रसंग सनराईज महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सतीशजी शिंदे(सर) यांना समजल्या नंतर सनराईज महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना (N S S) विभाग आणि सनराईज पब्लिक स्कुलच्या वतीने माणुसकीची व द्रातूत्वाची भावना लक्षात घेऊन या कुटुंबांना तातडीने भरपूर दिवस जाईल असे किराणा मालाचे किट तयार करून मोठ्या प्रमाणात शिंदे सरांनी मदत केली.
त्याच बरोबर श्रीगोंदा शहरातील अजून चार ते पाच गरीब कुटुंबातील महिलांना ही मदत श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार मा.महेंद्र माळी साहेब यांच्या हस्ते देण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी मा.नितीनजी खामकर साहेब,सनराईज महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सतीशजी शिंदे, (सर) पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी विशाल चव्हाण, लोकमंथन चे तालुका प्रतिनिधी योगेश चंदन,AM news चे तालुका प्रतिनिधी गणेश कविटकर,प्राध्यापक गोरखजी उंडे आदी उपस्थित होते.
