पिवळे,केशरी कार्डधारकांनाही मोफत गैस द्या.लॉकडाऊनमुळे रोजगार बंद असल्याने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न :- राजेश डांगे
दिनांक ७ एप्रिल, श्रीगोंदा:
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डॉऊन करण्यात आलेले आहे.परंतू सर्वसामांन्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे.मोलमजूर तसेच कंञाट पद्धतीवर कामाला जाणाऱ्या लोकांची तर अवस्था आज अतिशय केवीलवाणी झाली आहे.हाथाला काम नसल्याने पैशाची आवक पूर्णपणे थांबली आहे.
दरम्यान,केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेतील गॅसधारकांना तीन महीने मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे.सर्वञ या निर्णयाचे स्वागत होत आहे.परंतू,शहरासह जिल्ह्यात सर्वञ लॉकडॉऊन असल्याने,शेतमजूर,छोटे व्यापारी तसेच गंवडी,सुतार/प्लंबर,सेन्ट्रीग कामगार असे बांधकाम व्यवसायांशी निगडीत सर्व कामगार वर्ग संचारबंदीमुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे.
यामुळे शासनाने गांर्भीयाने विचार करुन पिवळे व केशरी कार्डधारकांना तीन महीने मोफत गैस सिलेंडर द्यावे,अशी मागणी सामांन्य लोकांच्या मागणीनुसार नगरसभा आंदोलन हे शासनाला करत आहे.या निवेदनाच्या प्रती सर्व संबधीत विभागाला व शासनाला ई.मेल द्वारे पाठवण्यात आल्या आहेत. तसेच सर्व लोक प्रतिनीधींनीही यासाठी त्वरीत शासनदरबारी पाठपुरवठा करावा असेही राजेश डांगे यांनी निवेदनात म्हटले आहे.
