लॉकडाऊनच्या दरम्यान गरजुंना मदतीचा हात.

दिनांक ७ एप्रिल (येळपणे,श्रीगोंदा):

येळपणे गावातील (कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक) विवेक पवार पाटील यांच्या सहकार्यातुन पुण्याची व्ही पुणेकर संस्था आणि अॅड. संग्राम देशमुख यांजकडून आज येळपणे गावातील गरीब आणि गरजुंना लोकांना पहिल्या टप्प्यात ५१ कुटुंबाला आटा, तेल,साबण, पोहे, मसाला, तांदूळ, बिस्किट पॅकेट आश्या वस्तू वाटुन सामाजिक बांदीलकी जोपासन्याचा स्तुत्य ऊपक्रम हाती घेतला.

गावात आनखी गरीब आणि गरजुंना हा मदतीचा हात देण्यासाठी विवेक पवार पाटील प्रयत्न करत आहेत.लॉकडाऊन दरम्यान ज्यांचे हातावर पोट आहे, शेतजमीन नाही, रोजगार नाही, अशा वनवन फिरणाऱ्या कुटुंबांसाठी हा ऊपक्रम हातात घेतलेला असल्याचे त्यांनी सांगितले. कौतुकास्पद ऊपक्रमाने आणि मायेच्या आधाराने परिसरात त्यांचे गोड कौतुक केले जात आहे. 

गरजुंना मदतीचा हात देताना विवेक पवार व राजेश सांगळे.(छाया:-राजेश सांगळे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading