दिनांक २९ सप्टेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यासह शहरामध्ये रेशन धान्य दुकानांमधून किडके धान्य वाटप होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्या अनुषंगाने चौकशी केली असता, श्रीगोंद्यातील एका रेशन धान्य दुकानामध्ये किडे पडलेले, अळ्या झालेले, बुरशी लागलेले, बारीक दगड, माती मिश्रित धान्य वाटप होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पुरवठा अधिकारी पाचरणे यांना फोन केला असता, ते मात्र नॉट रिचेबल होते.
श्रीगोंदा तालुक्यातील रेशन धान्य दुकानांमध्ये माती मिश्रित, किडे आणि बुरशी लागलेले धान्य कोरोना संकटांमध्ये वाटप करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत चौकशी केली असता, श्रीगोंदा शहरातील दीपक दत्तात्रय हिरणावळे यांच्या रेशन धान्य दुकानातून अशा पद्धतीने बुरशी, अळ्या, माती, किडे, खडे मिश्रित धान्य वाटप होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत (पुरवठा अधिकारी) पाचरणे यांना फोन केला.तर, त्यांचा फोन मात्र, कार्यक्षेत्राबाहेर होता.
श्रीगोंद्यातील सिद्धार्थनगर, ससाणेनगर या मागासवर्गीय वस्तीतील लाभार्थ्यांना अंत्योदय व प्राधान्य यादीतुन या धान्याचा लाभ मिळत असून, कोरोना प्रादुर्भावामध्ये मिळणारे अनुदानित धान्य तसेच दर महा मिळणारे धान्य अशा दुरावस्थेत मिळत असल्याने, लाभार्थी मात्र चिंता व्यक्त करू लागले आहेत. शासनाने धान्य देण्यापेक्षा न देणे बरे ! असेही ते म्हणताहेत.
रेशन धान्य दुकानदारास याबाबत विचारले असता, आपण काय करू शकत नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. तसेच, प्रशासन तरी काय करणार आहे ? असा नकारात्मक सूर त्यांनी काढला आहे.
स्रोत:(दीपक हिरणावळे यांच्या रेशन धान्य दुकानातुन उपलब्ध झालेले धान्य)
