कर्जबाजारी पणामुळे वडिलोपार्जित शेती गेली. इंदिरा गांधी पतसंस्थेत कलेक्शन एजंट म्हणून काम सुरू केले. त्यानंतर एक हॉटेल चालवायला घेतले. सन २००० मध्ये पुन्हा श्रीगोंदा शिवारात १४ एकर माळरान जमिन खरेदी केली. आणि या माळरान जमिनीवर संघर्षाचा सामना करणारी मारूती संपत डाके यांनी कृषीतज्ञ रमेश हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली डाळींब शेतीतून मोडलेला प्रपंच पुन्हा दिमाखात उभा केला आहे. आणि या शेतीतून डाके परिवाराची लाईफ स्टाईल बदलली आहे.
संपतराव डाके यांना मारूती व खंडू ही दोन मुले, चांगुणाबाई (पत्नी), संगिता मारूती डाके व मंदा खंडू डाके (सुना) संपतराव डाके यांनी दोन्ही मुलांना पदवीधर केले. मात्र ते अडचणीमुळे प्रपंचाला सावरू शकले नाही. परंतु त्यांनी कुटुंबाला संस्कार आणि शिक्षणाची शिदोरी दिली. मारूती डाके व खंडू डाके यांनी पाय ठेवायला जागा नसताना अशा परिस्थीतीत मारूती व खंडू डाके बंधूनी परिस्थितीशी झुंज देत नवे विश्व निर्माण करण्यासाठी परिश्रम व प्रामाणिकपणा अंगी बाळगला. या विश्वासाच्या बळावर समाजात प्रथम पत मिळविण्याचे काम केले.
मारूती डाके यांनी सुरूवातील बायोमिल कंपनीची एजन्सी घेतली. सन २००० मध्ये मित्रांच्या सहकार्याने १४ एकर जमीन खरेदी केली व जीवनात पुन्हा स्थिरता निर्माण होण्यासाठी आशेचे किरण निर्माण झाले. मारूती डाके यांनी रमेश हिरवे यांच्या मार्गदर्शना खाली सुरूवातील २ एकर डाळींबाचे लागवड केली. आणि या शेतीतून चांगले पैसे मिळताच ही शेती टप्प्या टप्याने वाढविण्याचे काम केले. यासाठी भिंगार अर्बन बँकेचे श्री. गोपाळराव झोडगे यांनी साथ दिली. कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, बाळासाहेब मगर, सतीश शिरसाठ, सोपानराव विखे, संभाजी गायकवाड, विश्वनाथ दारकुंडे यांनी शासनाच्या विविध योजना शेतीत राबविण्यासाठी लाख मोलाची मदत केली.
डाळींब शेतीत जैविक तंत्रज्ञान व पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला. त्याबद्दल कृषी विभागाने मारूती डाके यांना सन २०१२-१३ चा पंडित उद्यान हा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. डाळींब शेतीतून दर वर्षी १० ते १२ लाखाचा नफा झाला. शेतीला शाश्वत पाणी मिळण्यासाठी सुमारे २ कोटीचे शेततळे तयार केले.
डाळींब शेतीतून परिस्थीती बदलली. छपराचे घर जावून बंगला उभा राहिला पण गेल्या २ ते ४ वर्षात जो काही दुष्काळ पडला त्यामुळे शेतीवर गंभीर परिणाम झाला असून आता पुन्हा पिकाचा पॅर्टन बदलण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
संदेश
श्रीगोंदा तालुक्यात कुकडी घोडच्या पट्ट्यात पाण्याचा बेसुमार उपसा झाला आहे. त्यामुळे शेतीवर पुन्हा संकट येवू पाहत आहे. अशा परिस्थीत तरूण मुलांनी शाश्वत पाणी उपलब्ध केल्यानंतर एकुण क्षेत्राच्या ७० % क्षेत्र फळबाग किंवा अन्न लागवडीखाली घेणे गरजेचे आहे. त्यात रब्बी, खरीप हंगामाची पिके घेणे आवश्यक आहे.
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.
