दिनांक ८ मे,श्रीगोंदा:
ग्रामीण विकास केंद्र (जामखेड) आणि इकोनेट (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी व्यंकनाथ येथील नळ वस्तीवरील आदिवासी भिल्ल व पारधी कुटुंबांना अन्नधान्य व किराणा सामानाचे वाटप करण्यात आल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून,गेल्या दिड महिन्यापासून सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे हातावर पोट असलेल्या आदिवासी, भिल्ल,पारधी कुटुंबाची मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरू होती. ही बाब श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण विकास केंद्राचे कार्यकर्ते संतोष भोसले, लता सावंत आदींनी अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर इकोनेट (पुणे) या स्वयंसेवी संस्थेच्या संचालिका गौरीताई भोपटकर यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून आदिवासी कुटुंबांना गहू पीठ, साखर, शेंगदाणे, तेल, साबण, अशा किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापु ओहोळ, प्रकल्प समन्वय सचिन भिंगारदिवे, मनीषा काळे, शरद काळे, आसाराम काळे, विलास काळे, संस्थेचे कार्यकर्ते लता सावंत, मनिषा शिनगान, रोहिणी राऊत, छाया भोसले, पुष्पा कुसळकर, यशोदा काळे, उज्वल मदने आदी उपस्थित होते.
