दिनांक १४ मे,श्रीगोंदा:
श्रीगोंद्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मधील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच सर्व कर्मचाऱ्यांना श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटण्यात आले.श्रीगोंदा तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण ऑफिस, वन कार्यालय, कृषी ऑफिस या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मास्क व सॅनिटायजर वाटण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले,श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. गोरख बायकर,भाऊ डांगे,मुजफ्फर शेख,मल्लू भाई, प्रवीण ढगे,विशाल खेडकर, नितीन खेडकर इत्यादी उपस्थित होते.
या उपक्रमाबद्धल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
