छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गरजूंना किराणाचे वाटप..

दिनांक १४ मे श्रीगोंदा:

आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत वंचित घटकांना शंभूसेना संघटने मार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.कोरोना लॉकडाऊन मूळे सामांन्याचे जनजीवन प्रभावित झाले आहे.सर्वत्र बंद असल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाल्या आहेत. परिणामी साधारण कुटुंबांतील लोकांचे उपजीविकेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

शासनाच्या मदती बरोबर प्रत्येकाने दातृत्वाची भूमिका बजावणे गरजेचे आहे.अशा आपत्ती मध्ये शंभूसेना संघटना गरजूंना मदतीचा हात देत आहे. राज्यभर संघटनेच्या माध्यमांतून मदत केली जात असून,या उपक्रमासाठी अध्यक्ष दीपकराजे शिर्के व माजी सैनिक आघाडीचे सुनील काळे सह माजी सैनिकांचे योगदान लाभले आहे. जयंतीनिमित्त श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थनगर मधील वंचित घटकांना आज किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. पत्रकार चंदन घोडके यांच्या हस्ते या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी शंभुसेना संघटनेचे या उपेक्षित घटकातील लाभार्थ्यांनी आभार मानले आहेत.

यापुढेही शंभूसेना संघटना कोरोनाच्या संकटामध्ये सर्वसामान्यांच्या मदतीस तत्परतेने उभा राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष दीपकराजे शिर्के यांनी माध्यमांना सांगितले आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading