परिक्रमा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे चित्रकला स्पर्धेत यश.

दिनांक १४ मे(कष्टी,श्रीगोंदा):

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सौ. शालिनीताई विखे पाटील, रणरागिणी महिला बचत गट, लोणी आयोजित ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले आहे.

कु. शैला तांदुळकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर कु. धनश्री भोसले व कु. नेहा भगत यांनी उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली. विजेत्या विद्यार्थिनींना प्रा. वैशाली फाळके यांचे मार्गदर्शन मिळाले.

‘कोविड १९’साथीच्या लॉकडाउन मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा वक्तिमत्व विकास व्हावा. तसेच, शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत अभ्यासेतर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी परिक्रमा सतत प्रयत्नशील असते.

यशस्वी विद्यार्थिनीचे परिक्रमा संकुलाचे सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते व संचालक श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading