वाढदिवसाचा खर्च टाळून कोविड सेंटरला सँनिटाझर व स्प्रे चे वाटप..

दिनांक ११ सप्टेंबर,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठारचे युवा नेते गणेश कोठारे यांनी आपला वाढदिवस दरवर्षी प्रमाणे मोठा साजरा न करता. सद्य परस्थिति जानून घेऊन, त्यांचा वाढदिवस श्रीगोंदा कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांना सँनिटाझर व स्प्रे वाटप करून साजरा केला.

कोठारे यांनी सांगितले हे कर्मचारि आपला जीव मुठीत धरून रुग्णांची सेवा करीत आहेत.त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना छोटीशी भेट दिली आहे.

यावेळी डॉक्टर विलास आळेकर, प्रहारचे प्रथम शहरध्यक्ष नितीन रोही, राजेंद्र कुटे, सागर आळेकर, नानासाहेब गनिशे, नवनाथ आळेकर, सतिष आळेकर, सावता आळेकर, प्रज्वल आळेकर,सचिन मते उपस्थित होते.

स्रोत:(नितीन रोही यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading