“विकेल ते पिकेल” या कृषी अभियानाचे पेडगाव येथे थेट प्रक्षेपण

दिनांक ११ सप्टेंबर, पेडगाव/श्रीगोंदा:

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वकांक्षी ठरणाऱ्या “विकेल ते पिकेल” या कृषी अभियानाचे आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे शुभहस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण(लाईव्ह) यूट्यूब च्या माध्यमातून संपूर्ण राज्यात करण्यात आले. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून या उदघाटन कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण आज पेडगाव येथे शेतकऱ्यांच्या समवेत करण्यात आले.

सध्या सगळीकडे कोरोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आवश्यक ती काळजी म्हणून, हा कार्यक्रम लाईव्ह करण्यात आला. पेडगाव येथील काशिनाथ नगर मळ्यातील शेतकऱ्यांनी व महिलांनी या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा यूट्यूब च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण द्वारे अनुभवला, लाइव्ह प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीगोंदा यांचेवतीने श्री संदीप बोदगे, कृषि सहायक व आत्मा प्रकल्पाचे एटीएम अनिल औटी यांनी केले .

कार्यक्रमास काळूराम म्हस्के, परशुराम बोबडे, सतीश भोसले, सोमनाथ खेडकर, (महिला बचत गटाच्या सदस्य) शुभांगी म्हस्के, सविता शिंदे, शकुंतला शिंदे, सुरेखा शिंदे आदी उपस्थित होते..

विकेल ते पिकेल या कृषी अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी व महिला बचत गटांना कृषी प्रक्रिया उद्योगाच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. या अभियान अंतर्गत शेतकऱ्यांसाठी तीन योजनांचा शुभारंभ दिनांक १० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. मा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन(स्मार्ट) तसेच ग्राम पातळीवर ग्राम कृषी विकास समिती स्थापना व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना शुभारंभ या तीन योजनांची सुरुवात राज्यात करण्यात आली आहे.

बाजारातील मागणीनुसार पिकांचे व कृषिपूरक उत्पादनांचे नियोजन या योजनेच्या माध्यमातून होणार असून, शेतकऱ्यांना खरेदीदाराशी या योजनेद्वारे प्रत्यक्ष जोडले जाणार आहे.

स्रोत:(अनिल दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading