दिवाळीचे औचित्य साधून गोर गरिबांना मिठाई वाटप..

दिनांक १२ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना, समाजातील निराधार, पालात आणि रस्त्याच्या कडेला राहणारे गरीब कुटुंब मात्र, या आनंदापासून दूर असतात. या घटकातील लोकांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी गोर गरिबांना मिठाईचे बॉक्स वाटप केले आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

तसेच पक्षाच्या वतीने समाजातील सधन व्यक्तींनी गरीबाच्या घरी जाऊन, मिठाई व दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी आनंदाने साजरी करण्याचे आव्हान केले आहे. यावेळी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष आकाश भोसले, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप, तसेच मानव जाधव, तृषाल ससाणे इतर कार्यकते उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धीस मिळालेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading