कोरोनाच्या संकट काळात भेदभाव करू नका: पञकार रिजवान बागवान..

दिनांक २० ऑगस्ट,जामखेड:

कोरोना या भयानक व्हायरसने संपुर्ण देशामध्ये धुमाकुळ घातला असुन,मोठ्या शहरामध्ये दिसुन येणारा कोरोना व्हायरस आता माञ गांव खेड्यातही दिसुन येत आहे.

या पाश्वभुमीवर कोरोनाचे बाधित रूग्ण वाढत असुन, ज्या घरामध्ये कोरोना रूग्ण निघत आहे. त्या घराकडे व रूग्णाकडे समाजाचा पाहण्याचा दुष्टिकोन वेगळा होत चालला आहे. अशावेळी बाधीत रूग्णाला व त्याच्या कुटुंबीयांना धीर न देता वाळित टाकण्याचा प्रकार घडत आहे. या प्रकरणी शासनाने वेळीच दखल घेण्याची गरज असुन, असा प्रकार करणाऱ्या समाजकंटकावर कडक कार्यवाही करण्याची मागणी पञकार रिजवान बागवान यांनी केली आहे.

स्रोत: (पत्रकार रिजवान बागवान यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply