वंचितांचे संसार प्रशासनाच्या दारात आणि त्यांचा विकास निधी पुन्हा प्रशासनाच्या तिजोरीत..

दिनांक २० ऑगस्ट,श्रीगोंदा:

अनुसूचित जाती,जमाती व नवबौद्ध घटकांचा साधारण ४३ लक्ष रुपये विकास निधी, तांत्रिक अडचणी मुळे परत!..

श्रीगोंदा पंचायत समिती मार्फत अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास कामासाठी शासनाने मंजूर केलेला निधी तांत्रिक अडचणीमुळे परत गेल्याची माहिती समोर आली आहे.याविषयी श्रीगोंदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी माध्यमांनी विचारल्यानंतर रद्द झालेल्या कामांची यादी जाहीर केली आहे.

एकीकडे घर मिळत नाही तसेच शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये लाभ मिळत नाही म्हणून, आदिवासी पारधी समाजाचा एक युवक गेल्या चार वर्षांपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या बाहेर असलेल्या एका चिंचेच्या झाडाच्या आश्रयाला राहत आहे. शासकीय लाभापासून वंचित असल्याने त्यांने नाइलाजास्तव येथे राहण्याचे ठरवले आहे.नमूद प्रवर्गासाठी शासनाच्या वेगवेगळ्या जनकल्याण योजना असतांना, लाभार्थी अशा पद्धतीने उपेक्षित राहतात असून, शासनाने मंजूर केलेला लक्षावधी रुपये निधी संबंधित वंचित घटकांपर्यंत पोचत नाही. तसेच,तांत्रिक अडचणीं दाखवून विकास निधी रद्द केला जात आहे.अनेक वर्ष झाडाखाली वास्तव्यास असणाऱ्या अश्या शेकडो उपेक्षित बांधवांना याचा लाभ मिळणार की नाही? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील अनुसूचित जाती/जमाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत सन २०१८ व १९ या आर्थिक वर्षातील साधारण ४३ लक्ष रुपये निधी परत जाणे ही चिंतेची बाब मानली जात आहे.निधी सामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जिम्मेदारी स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य तथा पदाधिकाऱ्यांची असतांना, किरकोळ किंवा तांत्रिक अडचणीमुळे हा निधी दलित आदिवासींपर्यंत पोहचत नसल्याने सामाजिक व पुरोगामी चळवळीत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे याविषयी पाठपुरावा करणार असल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

ग्रामपंचायत कोसेगव्हाण,गावठाण मागासवर्गीय वस्ती, वीज पुरवठा, मंजूर रक्कम दोन लक्ष, कोळगाव, मोरवाडी रस्ता शिंदे वस्ती, वीज पुरवठा, मंजूर रक्कम दोन लक्ष, भावडी, गावठाण रस्ता कॉंक्रीट, मंजूर रक्कम नऊ लक्ष, विसापूर ते कुठे वस्ती, जठार मळा पाणीपुरवठा, दोन लक्ष, पारगाव सु., बौद्ध वस्ती जुनी, वीजपुरवठा दोन लक्ष, पारगाव सु., मातंग वस्ती इंदिरा आवास योजना घरकुल, हाय मॅक्स दोन लक्ष, वडाळी, शिंदे दलित वस्ती, श्रीगोंदा रोड, पाण्याची टाकी, १.३ लक्ष, पारगाव सु., घोडके वस्ती, हातपंप, ५० हजार रुपये, वडाळी, ससाने दलित वस्ती श्रीगोंदा रोड, पाण्याची टाकी, १.२८, कोंडेगव्हाण, साळवे वस्ती, हातपंप, एक लक्ष रुपये, म्हातार पिंप्री, घोडके वस्ती, स्ट्रीट लाईट, दोन लक्ष रुपये, आनंदवाडी, रोकडेवाडी, वीजपुरवठा तीन लक्ष रुपये, आढळगाव, तळईमाळ, मातंग/पारधी वस्ती पाणीपुरवठा, दोन लक्ष रुपये, घोगरगाव, नवीन गावठाण रस्ता कॉंक्रीट, पाच लक्ष रुपये, वेळू, सांगळे वस्ती, वीज पुरवठा, तीन लक्ष रुपये, देवदैठण, ससाने वस्ती, कॉंक्रीट रस्ता, पाच लक्ष रुपये, तांदळी दुमाला, मातंग वस्ती, समाज मंदिर दुरुस्ती, एक लक्ष रुपये असे साधारण ४३ लक्ष रुपयांचे अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत कामे रद्द झाली आहेत.

स्रोत:(अनुसूचित जाती/जमाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास करणे अंतर्गत रद्द कामांचा चार्ट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading