श्रीगोंदा शहरात डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह,सोलापूर प्रवास केल्याची माहिती..

दिनांक ९ जुलै,श्रीगोंदा:

शहरातील झेंडा चौक परिसरातील एका दाताचा दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी सदरील डॉक्टर सोलापूर जिल्ह्यात गेल्याचे समजते आहे. आतापर्यंत १८ जण या डॉक्टरच्या संपर्कात आले असून, त्यांचे घश्याचे स्त्राव नमुने घेण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.

डॉक्टरांना कॉविड केर सेंटर,श्रीगोंदा येथे ठेवण्यात आले आहे.श्रीगोंदा तालुक्यात एकूण ८ रुग्ण उपचार घेत असून, ६ रुग्ण नगर तर २ रुग्ण श्रीगोंदा येथे उपचार घेत आहेत. तालुक्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३ आहे.

तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी याविषयी माहिती विचारली असता, नमूद झेंडा चौक परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र बनविण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे किंवा नाही. हे मात्र समजु शकले नाही.

(स्रोत : तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading