दिनांक १ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
दिनांक १ ऑगस्ट २०२४ पासून श्रीगोंदा तालुक्यात खरीप हंगाम २०२४ साठी शेतकरी स्तरावरून मोबाईल द्वारे ई पिक पाहणी नोंदणीची सुरुवात करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यात एकुण ११६ गावे असून, महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
शेतकरी बांधवांसाठी हे आवाहन करण्यात येत आहे की, कृपया ‘ई पीक पाहणी DCS व्हर्जन 3.0.2’ ॲपद्वारे आपल्या मोबाईल हँडसेटमध्ये अद्यावत करून घ्यावे आणि आपल्या शेतातील पिकांची नोंद लवकरात लवकर पूर्ण करावी. शासनाकडून पिक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान जाहीर केले जाते. हे अनुदान शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी त्यांच्या पीक पेराची नोंदणी ई पिक पाहणी ॲपद्वारे करणे अत्यावश्यक आहे. जर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद केली नाही, तर त्यांना शासनाकडील अनुदान मिळणार नाही.
तालुका प्रशासनाने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपआपल्या शेतातील पीक पेराची नोंद तत्काळ ‘ई-पीक पाहणी’ ॲपद्वारे करावी. जर या कामात कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवली, तर संबंधित गावाचे तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी (महसूल), तालुका कृषी अधिकारी किंवा तहसिल कार्यालय श्रीगोंदा यांच्याशी संपर्क साधावा.
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बंधूंनी आपल्या पिकांच्या नोंदणीसाठी हे पाऊल उचलावे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)






