दिनांक २६ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या भव्य इमारत उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मविभूषण माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, मा. खा. शरदचंद्रजी पवारसाहेब उपस्थित राहणार आहेत.
या समारंभाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि माजी सनदी अधिकारी मा. चंद्रकांत दळवी भूषविणार आहेत, अशी माहिती महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी दिली.
समारंभाला विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, खा. निलेश लंके, माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, मीनाताई जगधने, आ. आशुतोष काळे, दादाभाऊ कळमकर, अहमदनगर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, राजेंद्र फाळके आणि डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे सचिव माजी सनदी अधिकारी विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव बी. एन. पवार, शिवाजीराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, कुंडलिकराव दरेकर, सुभाषशेठ गांधी, बाजीराव कोरडे, महावीर पटवा, नवनाथ बोडखे, शहाजी मखरे, राजेंद्र खेडकर इत्यादी मान्यवरांची देखील उपस्थिती अपेक्षित आहे.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे, प्राचार्य दिलीप भुजबळ, व मुख्याध्यापिका गीता चौधरी यांनी केले आहे.
स्त्रोत:(प्रसिध्दी पत्र)






