सरकारी कामात अडथळा करुन खुनाचा प्रयत्न करणारा फरार आरोपी जेरबंद.. श्रीगोंदा पोलिसांची मोठी कामगिरी..

दिनांक २५ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा/अहमदनगर:

जाहिरात..

सरकारी कामात अडथळा आणून खुनाचा प्रयत्न करणारा तसेच तीन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर श्रीगोंदा पोलिसांनी अटक केला आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीतील भारतीय दंड संहिता कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३५३ (सरकारी कामात अडथळा), ३३२ (सरकारी नोकरावर हल्ला), ३७९ (चोरी), १४३, १४७ (राईट) आणि गौण खनिज कायदा कलम ३, १५ अंतर्गत गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जिगर उर्फ बबलु कालु शेख (वय २३ वर्षे, राहणार तरडगव्हाण, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. तीन महिन्यांपासून फरार असलेल्या या आरोपीविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचून त्याला बगाडे कॉर्नर परिसरात ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या सूचनांनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने ही कारवाई केली. पथकात पोना गोकुळ इंगावले, पोकों संदीप शिरसाठ, आनंद मैड, संदीप राऊत आणि मोबाईल सेल अहमदनगर दक्षिण विभागाचे पोलीस कर्मचारी राहुल गुड्डू व नितीन शिंदे यांनी तांत्रिक सहाय्य केले.

गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने आरोपीचा शोध घेतला आणि श्रीगोंदा परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर करत आहेत.

स्त्रोत:(प्रसिध्दी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading