शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून ५० टक्के शुल्क आकारावे,काही संस्था पैश्यांकरिता सक्ती करीत असतील तर, त्यांच्यावर कारवाई करू:ऋषिकेश गोरे..

दिनांक १३ ऑगस्ट,श्रीगोंदा:

कोरोनामुळे पालकांकडे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता पैसा राहिलेला नाही. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच शुल्क आकारावे काही संस्था पैश्यांकरिता सक्ती करीत असतील तर, त्यांच्यावर कारवाई करू, लक्षात ठेवा हा विद्यार्थ्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. असा इशारा भाजपा युवा नेते ऋषिकेश गोरे यांनी पत्रकारांना प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रात नमूद केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये शाळांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या तक्रारीची गंभीर दखल गोरे यांनी घेत एक प्रसिध्दी पत्रक प्रकाशित केले आहे. त्यात ते म्हणाले आहेत कि, ज्या संस्था या पालकांच्या भरवशावर मोठ्या झाल्या आहेत. अशा संस्था किमान एक वर्षे अर्धे शुल्क घेऊ शकत नाही का ? जर तुम्ही सक्ती केली.तर, गाठ आमच्याशी आहे.हे शिक्षणसंस्थांनी लक्षात ठेवावे. शिक्षणसंस्थांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास  एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला कारवाई करावी लागेल. शेतकऱ्यांवर दर दोन-तीन महिन्यांनी संकटे येत असतात. पण, शिक्षणसंस्थांवर आत्तापर्यंत कुठलेच संकट आलेले नाही. शिक्षणसंस्था या फायद्यातच होत्या, एखाद्या शिक्षण संस्थेने आमची संस्था तोट्यात गेल्याचे नमूद करावे.गेल्या २० वर्षांपासून या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्कावर आम्ही कधीही बोललेलो नाही.असेही गोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

स्रोत:ऋषिकेश बाळासाहेब गोरे (भाजपा-युवा नेते)

Leave a Reply