दिनांक २५ जून २०२४ श्रीगोंदा:
श्रीगोंदा ते कोळगांव मार्गावर वडाळी तलावाजवळ घडलेल्या अपघातात सार्थक सुनील वागसकर (वय १५ वर्षे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात ८ जून २०२४ रोजी सायंकाळी ४:३० वाजता घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक वागसकर हा स्वराज कंपनीचा ७२४ मॉडेलचा ट्रॅक्टर (क्र. एमएच १६ डी.सी. ३५६६) चालवत होता. जनावरांचा चारा शेतातून घरी नेत असताना ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. या अपघातात सार्थक गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरचेही नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार नंदकुमार भैलुमे यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला. प्रकरणाची नोंद भा.द.वी.क. ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मो. वा. का. क. १८४/१७७ प्रमाणे करण्यात आली आहे.
सार्थकच्या निधनाने वागसकर वस्ती, वडाळी या गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मॅक्सकेअर हॉस्पीटल, अ.नगर येथे सार्थकचा मृतदेह नेण्यात आला होता. तपास अधिकारी पोहेकॉ आर.के.शिंदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
स्रोत:(फिर्याद)



जाहिरात..
