दिनांक २५ जुन २०२४,श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळगाव येथे घरफोडीचा एक गंभीर प्रकार घडला आहे. दगडाबाई विनायक कागुंणे (वय ५६ वर्षे) यांच्या राहत्या घरी २४ जून २०२४ रोजी रात्री ८:०० वाजल्यापासून २५ जून २०२४ रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात आरोपींनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला आणि घरातील सोन्याचे दागिने आणि १९ हजार रुपये रोख रक्कम मिळून एकूण २९,००० रुपयांचे सामान चोरीला गेले आहे.
या घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली असून, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पो.हे.का. एस.यु.शिंदे यांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी अधिकारी पो.नि. ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पो.ना.सग्रांम जाधव हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आरोपींची ओळख पटविण्याचे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी सावध राहावे आणि आपली सुरक्षा सुनिश्चित करावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्रोत:(फिर्याद)



