दिनांक २६ जुन २०२४, श्रीगोंदा: श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मढेवडगाव येथे दिनांक २३ जून २०२४ रोजी रात्री ३:४० वाजता अज्ञात व्यक्तीने इन्डस मोबाईल टॉवरमधून १५,००० रुपयांचे कार्ड, केबल इत्यादी साहित्य चोरी केले.
फिर्यादी परमेश्वर सुधाकर राख, वय ३७ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार थेरला, पाटोदा, बीड यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची नोंद २५ जून २०२४ रोजी रात्री ८:२२ वाजता करण्यात आली. तपासासाठी पोलीस हवालदार एस.यु.शिंदे हे नेमले गेले आहेत, तर प्रभारी अधिकारी म्हणून पो.नि. ज्ञानेश्वर भोसले कार्यरत आहेत. तपास अधिकारी म्हणून पो.ना.ज्ञानेश्वर भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत.
स्रोत:(फिर्याद)



