टाकळी लोणार येथे महिलेच्या घरात घुसून हल्ला; सोन्याचे दागिने, मोबाईलची तोडफोड..

दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे एका महिलेसह तिच्या कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना घडली. सदर प्रकारातील फिर्यादी सौ.गोडसे (वय ४४ वर्षे) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या हल्ल्यानंतर आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता सौ. गोडसे यांच्या राहत्या घरात सात आरोपींनी अनधिकृत प्रवेश करून हल्ला चढवला. फिर्यादीचे मुलगा सोमनाथ याने गावात लावलेल्या फटाक्यांच्या स्टॉलची व्हिडिओ शूटिंग का केली?, याबद्दल विचारत त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी फिर्यादी आणि तिची सुन यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी मुबारक गुलाब शेख यांनी तलवार लावून त्यांना धमकावले.

आरोपींनी महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन करत त्यांच्या साड्या ओढून लज्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवाय, दोघींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून घेतले. त्यापैकी एक सोन्याची चैन ४५,००० रुपयांची असून ती दीड तोळा वजनाची आहे. सोमनाथचा मोबाईल देखील तोडफोड करण्यात आला आहे.

या घटनेनंतर, फिर्यादीच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात 1) मुबारक गुलाब शेख, 2) समीर गुलाब शेख, 3) गुलाब चंदुभाई शेख, 4) अरबाज समीर शेख, 5) तनवीर मुबारक शेख 6) साहिल मुबारक शेख 7) आयशा समीर शेख सर्व रा. टाकळी लोणार ता. श्रीगोंदा या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११९(१), ७४, ३३३, ३२४(४), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) तसेच आर्म्स अॅक्ट ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस तपास करीत आहेत.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading